चांदुर रेल्वे – प्रथमेश वानखडे
दिशा लोकसंचालित साधन केंद्र चांदुर रेल्वे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ शनिवारला महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा अमरावती (महाराष्ट्र शासन अंगीकृत) माविम सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा व सकस आहार रेसिपी स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये स्वामी समर्थ गटाला प्रथम पारितोषिक मिळाले तर द्वितीय पारितोषिक राधिका गट मालखेड याना मिळाले असून तृतीय पारितोषिक गाडगेबाबा गट वीरगव्हाण ला मिळाले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला कॉलेजच्या प्राध्यापिका अनिता ध्रुवे यांनी सकस आहारा विषयी महिलांना मार्गदर्शन केले. तर सकस आहार म्हणजे काय तर सकस आहार हा कडधान्यापासून बनलेला पदार्थ म्हणजे सकस आहार होय असे महिलांना सांगितले. महिलांच्या जीवनामध्ये खूप अशा अडचणी येतात. व एक महिला अशी व्यक्ती आहे की संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्या महिलेवर असते त्यामुळे महिलांनी आपल्या आहारावर विशिष्ट लक्ष द्यावे असे संबोधले त्यांनी व्यासपीठावरून महिलांना आव्हान केले. की शेतामध्ये कडधान्य सारखे आणि कमी पाण्यामध्ये उत्पादन होणारे पिके ज्वारी, बाजरी, मका पिकवावे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. खंडारे मॅडम, सी एम आर सी अध्यक्ष रंजना कांबळे, दिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनाताई दुबे, आणि संपूर्ण स्टॉप उपस्थित होता. आणि महिलांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
Post Views: 82
Add Comment