धामणगावकरांनी घेतली मतदानाची शपथ
धामणगाव रेल्वे –
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार जागृतीच्या संदर्भाने स्वीप कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीतर्फे मतदार जागृती आणि शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मतदार जनजागृती उपक्रम अंतर्गत येथील पंचायत समिती तर्फे मतदार जन जागृती रॅली सोमवारला (ता.११) काढण्यात आली.यात चौकाचौकात पथनाट्य सादर करण्यात आले.
लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते.याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे.किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे आहे.एक सुज्ञ मतदार या नात्याने मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजवावा.यासाठी कर्तव्याची जाणीव करुन देण्यात येत आहे. मतदार जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान तालुकास्तरावर एकत्रित येवून रॅली,पथनाट्य व मतदानाची शपथ आदी जनजागृती उपक्रम येथील पंचायत समिती कार्यालयात राबविण्यात येत आहे.
यावेळी गटविकास अधिकारी संजय पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी मीना म्हसतकर,बाल विकास प्रकल्प अधिकारी गायत्री चव्हाण,गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर, सहायक प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी,कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय गुल्हाने,गजानन सांगळे सहाय्यक लेखाधिकारी अमोल गोफने,कृषी अधिकारी राजू सावळे,उमेद अभियानाचे संदीप गजभिये,कृषी विस्तार अधिकारी शुभम खंडेझोड,विस्तार अधिकारी सांखिकी सचिन मिसाळ,आरोग्य विस्तार अधिकारी संजय गव्हाणे, कनिष्ठ लेखाधिकारी प्रणव कापकर,मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल ठाकरे, संजय मते, सौरभ दुबे, पुरुषोत्तम खराबे, सुरज बकाले, राहुल गुल्हाने, विजय मोरे, गटसमन्वयक धीरज जवळकार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील रोंघे, केंद्र प्रमुख बाळासाहेब मुंदे, प्रफुल्ल डाफ, डी.एस.राठोड, नरेश पाटील, जगदिषकुमार सिरसाट, साधन व्यक्ती शेषराव चव्हाण, कलेश कांबळे, ज्योती राऊत, वैशाली लीलर्व्हे, वैभव गवते, हेमंत कोटांबकर, रविकिरण खवले, प्रवीण ठाकरे, मनोज शिंगणापुरे, वैशाली सोनपरोते, कनिष्ठ अभियंता प्रवीण आखरे, अभिजीत कल्ले, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शशांक जारी, अजिंक्य खेर्डे, मनीष बनपट्टे, वरिष्ठ सहाय्यक प्रकाश महात्मे, गजेंद्र काळे, दिनकर काष्टे, संजय चव्हाण, सचिन गायकी, अजय सोनकुसरे, दुर्योधन चव्हाण, अमोल कावरे, विजय जीरापुरे, पंकज यादव, मंगेश राऊत, लखन चव्हाण, संतोष वानखडे, प्रशांत मनवर, ग्रामसेवक संघटनेचे सुनील केणे, महेंद्र शेलार, सचिन तसर, विस्तार अधिकारी सांख्यिकी गोपाळ वानखेडे, मोबीन खान, सोनाली कडू, अश्विनी सुलताने, मीनल पाटील, सुशिला राठोड, ऋतुजा हुमणे, प्रेमकुमार अंबुलकर विशाल सुटे, अजय सरदार, रवींद्र देशमुख, बंडू वैरागडे, राजू पांडे, हेमलता परमार, राजू पवार व आदी उपस्थित होते.तसेच संदीप गजभिये,अजय सरदार,अमित ढवळे,आशिष कळसकर,विवेक महागावकर, श्री काळपांडे, स्नेहल सोनटक्के, हितेश वाघाडे व आदी उपस्थित होते.
Add Comment