राजकीय

मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील – वीरेंद्र जगताप

गद्दारांमुळे संपूर्ण राज्याचे नुकसान झाले ;- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे…

धामणगाव रेल्वे –

धामणगाव मतदार संघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारार्था नांदगाव खंडेश्वर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडणारी बुलंद तोफ तथा आपल्या वाकचातुर्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर पकड निर्माण करणारी व्यक्तिमत्व मा. अँड. सुषमाताई अंधारे उपस्थित होत्या. त्यांनी देशात महामारीने थैमान घातलेले त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारने घेतलेली दक्षता ही जनतेच्या कल्याणासाठी होती. कर्तुत्वान व्यक्तीला जाहिरातीची गरज नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांचे कार्य पंचक्रोशीत पसरलेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय मिळवून देईल.
            प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी जनतेला विश्वास दाखवत ग्वाही दिली की पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या जनतेला मी कधीही नाराज करणार नाही. या सभेला खा. बळवंत वानखडे, राजेंद्र गवई, तुकाराम भस्मे, मनोज कडू, गणेश रॉय, सूनील मेटकर, नितीन गवळी तथा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!