क्राईम

विजयी मिरवणुकीत अरेरावी ; कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की ; ८ आरोपींना बेड्या

जनसूर्या मीडिया

अकोला – अकोला पश्चिम विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विजय मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही जणांनी कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता काही जणांनी पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी रविवारी (ता.२४) ८ आरोपींना अटक केली.
तौफीक खान शब्बीर खान (वय ३४, रा. संजय नगर, नायगाव, अकोला), मोहम्मद अबुबखर रफीक कुरेशी (वय २५, रा. कागजीपुरा, अकोला), मोहम्मद आदील खत्री मोहम्मद अख्तर खत्री (वय २७, रा. कागजीपुरा अकोला), इरशाद हुसेन लियाकत हुसेन (वय ३०, रा. इनामपुरा, अकोला), अब्दुल सादीक अब्दुल बशीर (वय ३२, रा. संजयनगर, इक्बाल कॉलनी, अकोला), अजीम खान इकबाल खान (वय ३२, रा.काळी मस्जीद जवळ, अकोला), जावेद खान जिलानी खान (वय २९, रा. भारतनगर, अकोला), सैयद अशरफ सैयद मकसूद (वय ७०, रा.नवाबपुरा, अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अकोला पश्चिममधील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माळीपुऱ्यातून विजयाचा जल्लोष करत असताना काही जणांना पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर काही जणांनी रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला घेराव घालत धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता गुन्ह्यात पाच पेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली. पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश नावकर, उपनिरीक्षक प्रदिप जोगंदड, निलेश गायकवाड, सुरेश मोरे, पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला, दादाराव टापरे, किशोर गवळी, संतोष गवई, विजय सावदेकर, गितेश कांबळे, जगदीश इंगळे, संजय भगत, श्याम मोहळे, अनिल धनभर, रोशन पटले आदींनी ही कारवाई केली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!