धामणगाव रेल्वे

अल्पवयीन तसेच विना कागदपत्र दुचाकी चालवणाऱ्याना दत्तापूर पोलीस प्रशासनाने धरले धारेवर

प्रतिनिधी :- धीरज भैसारे

धामणगाव रेल्वे शहरातील अल्पवयीन तसेच विनापरवाना दुचाकी वाहन धारकांना पोलिस प्रशासनाने दि. ०२ मार्च ला या संध्याकाळी ६ च्या सुमारास चांगलेच धारेवर धरले असून शहरातील शास्त्री चौकात मोठ्या बंदोबस्तात सुमारे तीन तास दुचाकी वाहन धारकांची तपासणी केली असून पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला. दुचाकी वाहनाचे कागदपत्र नसणाऱ्यांना चांगलाच चोप मिळाला आहे.
           सातत्याने अपघातात वाढ होत असताना तसेच अल्पवयीनांचे सुसाट पद्धतीने वाहन चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या कारवाई मधून नक्कीच चपराक बसणार आहे तर शहरातील पोलिस प्रशासनाच्या या कामगिरी चे जनमानसात स्वागत करण्यात आले असून सातत्याने अशा प्रकारच्या कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी जनसामांन्यांकडून होत आहे.
      सदरच्या कारवाई दरम्यान स्वतः दत्तापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन देशमुख सह त्यांचा पोलीस स्टाफ उपस्थित होता.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!