कचऱ्याच्या ढिगाऱ्या पासून नागरीकांच्या आरोग्यास धोका
प्रतिनिधी – गजानन फिरके
अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत वाढोणा येथे स्वच्छ भारत अभियान सरकारचा सर्वात महत्वकांक्षी उपक्रम पार पडला.आपला देश स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने दोन ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकारचा महत्व महत्वकांक्षी स्वच्छता उपक्रम आहे.
असे वाढोणा ग्रामपंचायतीत शपथ घेते वेळी बोलल्या जाते.महात्मा गांधी जयंती दिनी स्वच्छता अभियान राबविण्यात आले भारत सरकारच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 1954 मध्ये पहिला औपचारिक स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आला 1982 मध्ये राष्ट्रीय स्वच्छता कव्हरेज फक्त दोन टक्के होते यानंतर 1986 मध्ये केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सीआरपी राबविण्यात आला स्वच्छता भारत अभियान स्वच्छ भारत मिशन राजकारणाच्या पलीकडे असून ते देशभक्ती पेरीत आहे असे असताना सुद्धा ग्रामपंचायत वाढोणा येथे कचऱ्याचे ढिगारे. साफसफाई न करता नाल्या मध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे हा उपक्रम देखावा म्हणून तर नाही ना. अशी जनमानसात चर्चा आहे कारण ग्रामपंचायत लगत कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे..
गाव स्वच्छ निरोगी केव्हा होईल. या ग्रामपंचायत मधील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असे अनेक नागरिकांच्या आरोग्याची खेळणारे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Add Comment