कुऱ्हा प्रतिनिधी –
श्रीराम शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हा, येथे शनिवार, दि. २२ जून २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना पथक व निसर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षोत्सव पंधरवडाच्या निमित्ताने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय परिसर, येथे वृक्षारोपण करण्यात आले. विद्यापीठाच्या प्राप्त पत्रा मधे नमूद केल्या प्रमाणे वड, पिंपळ, कडूनिंब, अर्जुन, पुत्रंजिवा, सीसाम, बेहदा, आवळा, चिंचा, काडाम, कांचन आदी रोपट्यांचे रोपण करण्यात आले.
वरील उपक्रम महाविद्यालया चे प्राचार्य मा. डॉ. एस. बी. आखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रा. से. यो. अमरावती विद्यापीठाच्या निवृत्त श्री. राजेश पीदडी प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आले. या उपक्रमाला उपस्थित रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय अभ्यंकर डॉ. निशा जोशी, सह निसर्ग मंडळाचे पदाधिकारी डॉ. विभा देशपांडे तसेच परिसरातील नागरिकां च्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले.
उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता रासेयो स्वयंसेवक यश पोकळे, संकेत राऊत, ऋषिकेश निंबरते, लक्ष्मी राउत, यांनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 75
Add Comment