आरोग्य विषयक

जळका हिरापुर येथील बौद्ध विहारात तीन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

प्रतिनिधी – शशांक चौधरी

सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था विश्व पॉलीक्लिनिक चांदुरबाजार व आरोग्यम दवाखाना शिराळा तर्फे जळका हिरापुर येथील बौध्द विहारात तीन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. १३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सदरच्या आरोग्य तपासणी शिबिरात उपलब्ध औषधी मोफत वाटप करण्यात आल्या असून त्यासोबत योग व योगासन, ईलेक्टिक मशिन उपचार मसाज, व्यायाम, फिजिओ नॅचरोथेरपी, कर्णबिंदु चिकित्सा एक्युप्रेशर या उपचारांचा समावेश करण्यात आला होता.

आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेताना नागरिक

शिबिराला सु. ब. संस्था चांदुर बाजार अध्यक्ष डॉ. राहुल अहिर, आयुर्वेदाचार्य वैद्य रुपेश काळे दर्यापूर, भौतिक उपचारक संदिप मानमोडे, मसाज थेरपिस्ट वैशाली राऊत तसेच सहकारी आयुर्वेदिक औषधी वितरक राहुल बलिंगे, अलोपॅथी औषधी वितरक विनोद रामटेके, शंभु अग्रवाल तसेच जळका हिरापुर सरपंच श्रध्दा मनिष देशमुख, उपसरपंच दिलीप डाहाके, बंडुभाऊ मकेश्वर, गोपाल मकेश्वर रोजगार सेवक आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!