आरोग्य शिबीर मध्ये गावाकऱ्यांनी उत्तम प्रकारे घेतला सहभाग
अंजनसिंगी –
येथे गुरुदेव सेवा मंडळ व प्रहार जनशक्ती तर्फे शिवजयंती निमित्य व्याख्यान चे आयोजन केले होते तसेच काही दिवसा अगोदर शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र व कार्य यावर परीक्षा आयोजित केली होती त्यामध्ये प्रथम प्रहार जनशक्ती पक्ष धामणगाव रेल्वे तर्फे तर द्वितीय शुभम प्रदीप ठाकरे तर तृतीय बक्षीस रामभाऊ रमेश शिर्के यांनी दिले.
गुरुदेव सेवा मंडळ येथे सकाळी ६ वाजता ध्यान व प्रार्थना करण्यात आली नंतर सकाळी ८ वाजता शिवचरित्र वाचन करण्यात आले नंतर दिवसभर सकाळी १० वाजता पासून आरोग्य शिबीर ४ वाजेपर्यन्त ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आले यामध्ये आरोग्य शिबीर मध्ये गावाकऱ्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद देत बॉडी प्रोफाइल करून घेतले यामध्ये डॉ आनंद जैन व त्यांच्या टीम ने आरोग्य शिबीर पार पाडले नंतर ५ वाजता ग्रंथदिंडी काढण्यत आली ग्रंथादिंडी मध्ये शिवाजी महाराज यांच्या घोषणा देण्यात आल्या नंतर ६ वाजता समुदायिक ध्यान घेऊन सायंकाळी ७ वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रवींद्र पवार हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक काळे हे होते यावेळी प्रमुख वक्त्यांचे भाषण घेण्यात आले नंतर् स्पर्धे मध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थनाचे बक्षीस वाटप करण्यात आले. विशेष पारितोषिक अवधूत झिबड यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच रुपाली गायकवाड उपसरपंच अवधुत दिवे कैलास ठाकरे कपिल पडघान गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष सतीश वाळके प्रहारचे गाव अध्यक्ष आशिष भाऊ मानकर हे होते.
यावेळी सूत्रसंचालणं विशाल ठाकरे यांनी केले तर तर प्रमुख वक्ते म्हणून असलेले रवींद्र पवार यांनी योग्य मार्गदर्शन करत शिवाजी महाराजांच्या विचारांचे तरुण घडणे काळजी असे सांगितले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशाल ठाकरे, सागर ठाकरे, संगम बनासुरे, रंजित घावत, विशाल डेहनकर, मयूर माकोडे, सागर ढोरे ऋषी डेहणकर, गोपाल पाटील, विजय ठाकरे, दीपक झाडें, रोशन भोयर, शुभम भोयर्, आशिष जिचाकर, गोलू बोबडे, अमोल ढगे इत्यादी गावाकऱ्यांनी मदत करत कार्यक्रमाला संपूर्ण गावकरी उपस्थित होते
Post Views: 67
Add Comment