क्राईम

अन्…. त्याने थेट पोलिसांचीच कॉलर पकडून केली मारहाण

जनसूर्या मीडिया

कर्नाटकातील मंड्या येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला थप्पड मारली आणि त्याची कॉलरही पकडली.
या वेळी इतर पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याची हिंमत एवढी वाढली की त्याने पोलिसाची कॉलर सोडली नाही. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंड्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. आरोपी व्यक्ती, माजी नगराध्यक्षाचा मुलगा असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मंड्यातील पांडवपुरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आपल्या कुटुंबात सुरू असलेल्या जमिनीच्या वादावर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराने सुरुवातीला त्या व्यक्तीला थप्पड मारली आणि त्याची कॉलर पकडली. त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि ‘मला का मारताय?’
दरम्यान, इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून तो आटोक्यात आणला. आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही बाब उघडकीस आल्यानंतर या चर्चेला जोर आला आहे की, लोकांना कायदा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही का? अखेर पोलीस ठाण्यासमोर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला एखादी व्यक्ती कशी मारहाण करू शकते? व्हिडिओमध्ये दिसत आहे की आरोपीला पोलिसांची भीती वाटत नाही आणि तो दोन पोलिसांची कॉलर पकडतो. इतर पोलीसांनी त्या माणसाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे मनोबल उंचावलेले असते आणि त्याला कायद्याची अजिबात भीती वाटत नाही.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!