वनविभागाच्या टीमची कौतुकास्पद कामगिरी
धामणगाव रेल्वे –
आपल्या पिलांच्या शोधात ती बिबट मादा आली आणि १६ फेब्रुवारी सकाळी ३ ते ५ च्या सुमारास आपल्या पिलांना सुखरूप घेऊन गेली. मंगरूळ दस्तगीर परिसरातील बबलू जयस्वाल यांच्या शेतात दि. १५ फेब्रुवारी रोजी बिबट्याची २ लहान बछडे मिळून आल्याने एकाच खळबळ उडाली होती. वनविभागाच्या टीमला या संदर्भात माहिती देण्यात आली असताना त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ दखल घेत घटनास्थळ गाठून त्या दोन्ही बछड्याना सुरक्षितरित्या रेस्क्यू करून घेत त्यांची वैधकीय तपासणी केली.
सकाळी ३ वाजून ४ मिनिटाने आपल्या बछड्याला घेऊन जाताना बिबट मादा कॅमेरात कैद
आपल्या आईपासून दूर झालेल्या बछड्याना पुन्हा सुखरूप आपल्या आईशी भेट व्हावी याकरिता वनविभागाच्या टीम समोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या टीमने ज्या ठिकाणाहून त्या बछड्याना रेस्क्यू केले होते त्याच ठिकाणी त्याना सोडण्यात आले व कॅमेराच्या साह्याने त्यावर रात्रभर लक्ष ठेवण्यात आले. अखेर १६ फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ३ वाजून ४ मिनिटांनी त्या बछड्याची आई त्या ठिकाणी येऊन त्यातील एका बछड्याना घेऊन घेली व दुसऱ्या बछड्याला ५ : ३० वाजताच्या सुमारास घेऊन जाताना कॅमेरात कैद झाली. सदरची बाब वनविभागाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रॅप लावून संपूर्ण परिसरात पेट्रोलिंग केली, पण ती बिबट मादा मिळून आली नाही तर त्या बिबट मादीने सुखरूपरित्या आपल्या बछड्याना सुरक्षित ठिकाणी घेऊन घेली असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधानता बाळगावी असे आव्हान वनविभागाच्या टीमने केले आहे.
Add Comment