५०० फूट अंतर आणि वार्षिक उत्पन्न या अटी रद्द, तर अनुदानातही वाढ
जनसूर्या मीडिया –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे.
वरिष्ठ कार्यालयाकडे अनुदान वाढीसह अटी शिथिल कराव्यात, यासाठी कृषी समिती वारंवार मागणी करीत होती, गेल्या महिन्यात वाढीव अनुदान मंजूर होऊन अवघड झालेल्या अटी रद्द करण्यात आल्या. अनुसूचित जाती/नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेतून विविध बाबींसाठी अनुदान देण्याची व्यवस्था आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे.
तसेच, नवीन तीन बाबींचा समावेश केला आहे. यापूर्वी विहिरीआठी अडीच लाख अनुदान होते, ते चार लाख रुपये केले आहे. तसेच, इतर बाबींसाठी जवळपास दुप्पट अनुदान वाढविले आहे. त्यामुळे विहीर दुरुस्त १ लाख, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण २ लाख, इनवेल बोअरिंग ४० हजार, वीज जोडणी आकार २० हजार, पंप संच ४० हजार, ठिबक सिंचन ९७ हजार, तुषार सिंचन ४७ हजार नव्याने समावेश केलेल्या पीव्हीसी पाइपसाठी ५० हजार, यंत्रसामग्री ५० हजार, परसबाग ५ हजार अनुदान केले आहे.
या दोन अटी रद्द
विहिरींमध्ये ५०० फूट अंतर असावे, वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये असावे या दोन अटी रद्द केल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी संख्या वाढणार आहे.
Post Views: 32
Add Comment