महाराष्ट्र

रेल्वेच्या धक्क्याने गुराखी जागीच ठार ; बांभोरीनजिक घडली घटना

जळगाव – जनसूर्या मीडिया

४ एप्रिल २०२४ । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ६५ वर्षीय गुराखीचा जागीच मृत्यू झाल्याची घडलीय. डोंगरु दलपत सपकाळे (वय-६५, रा. बांभोरी ता. धरणगाव) असे मयत गुराख्याचे नाव असून याबाबत आज गुरुवारी शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे डोंगरु सपकाळे हे वास्तव्यास असून ते नेहमीप्रमाणे बुधवारी ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ते त्यांच्याजवळ असलेल्या बकऱ्या चरण्यासाठी रेल्वे रुळाजवळील परिसरात घेवून गेले. सायंकाळी अंधार पडण्यास सुरुवात झाल्यानंतर डोंगरू सपकाळे हे चरत असलेल्या बकऱ्यांना एकत्रित करुन त्यांना घरी जाण्यासाठी निघाले. परंतु सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या रेल्वेची धडक बसली.
त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या डोंगरू सपकाळे यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी त्यांनी डोंगरु सपकाळे यांची ओळख पटवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे व सिद्धेश्वर लटपटे हे करीत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!