अमरावती

वरुड शहरात थॅलेसेमिया जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन

ऑरेंज सिटी थॅलेसेमिया निर्मूलन समितीचा उपक्रम

अमरावती / वरूड :- निलेश निंबाळकर

थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वरुड शहरातील सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मूलन समिती, वरुड द्वारा थॅलेसेमिया जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाकरिता अमरावती जिल्हा थॅलिसिमिया निर्मूलन समितीचे अध्यक्ष दलवीरसिंग व्यास व उपाध्यक्ष विकास काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे आयोजन ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मूलन समिती वरुडचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बाईक रॅली ची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यांना हारार्पन व पूजन करून करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी थॅलेसिमियाबाबत माहिती देऊन यावर कोणते उपाय करता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

         या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र राजोरिया, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. विजय देशमुख, डॉ. आदित्य उपासे, डॉ. मीनाताई बंदे, डॉ. चरण सोनारे, मायाताई यावलकर, नितीन खेरडे, ईश्वरदास शेकापुरे, लोकेश अग्रवाल, योगेश्वर खासबागे, अतुल काळे, अक्षय वैद्य, प्रज्वल बोंडे, पंकज लेकुरवाळे, संदेश कावरे, यशपाल जैन, चंद्रकांत सिंगरवाडे प्रवीण सावरकर, स्वप्निल आजनकर, सचिन परिहार, स्वानंद वानखडे, महेश बिलगये, प्रदीप गणोरकर, अनिल काळुसे, मोरेश्वर बोरकुटे, सानप इत्यादी सामाजिक कार्यकर्ते तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, निमा असोसिएशन, महिला विकास मंच, जिजाऊ ब्रिगेड, जेसीआय असोसिएशन, रोटरी क्लब, समाज प्रबोधन मंच, वकील बार असोसिएशन, संकल्प युवा ग्रुप, श्रद्धा शिक्षण संस्था, बजरंग दल, पत्रकार संघटना, अकॉर्ड फाउंडेशन, स्व. रामस्वरूपजी शेटीये बहुउद्देशिय संस्था, जायंट्स ग्रुप, युवा व्यापारी संघ, पावर ऑफ मीडिया, मराठी पत्रकार संघटना, व्यापारी संघटना, स्व शिवरामजी हिवसे बीएड कॉलेज या सर्व सामाजिक संस्था व संघटनेचे पदाधिकारी व सदस्यगण प्रामुख्याने उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे संचालन समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र शेटीये व आभार प्रदर्शन समितीचे संघटक प्राचार्य किशोर तडस यांनी केले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!