धामणगाव रेल्वे

सुंदर गाव पुरस्कारावर मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायतने कोरले नाव

आर आर (आबा) पाटील सुंदर गाव २०२० – २१ या वर्षाची मानकरी ठरली मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत

धामणगाव रेल्वे –

ग्रामविकास विभागामार्फत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार या योजने अंतर्गत २०२० – २१ या वर्षात तालुका स्तरावर राबविण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषांमध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत ला सर्वाधिक गुण प्राप्त झाल्याने आर आर (आबा) पाटील सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले. तसेच ग्रामपंचायत ला रोख रक्कम १० लक्ष रुपये प्राप्त झाल्याची माहिती सरपंच सतीश हजारे यांनी दिली आहे.

मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय हे माझे एकट्याचे नसून ग्रामपंचायत सचिव, उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांचे असून तेवढच सहकार्य हे गावकऱ्यांचे मिळाल्याने हा पुरस्कार मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत ला मिळाला असल्याचे मत यावेळी सरपंच सतिश हजारे यांनी मांडले. तर गावातील आरोग्य विषयक कचरा सातत्याने संकलन करून त्याची विल्हेवाट लावणे, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणे तसेच वेळोवेळी कॅम्प आयोजित करून सर्वसामान्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले. त्याचेच फळ म्हणून गावाला सुदर गाव पुरस्काराचे मान मिळाला असल्याचे सुद्धा सरपंच यांनी सांगितले तर यानंतरही सातत्याने गावाच्या विकासासाठी तत्पर असल्याचे मत प्रसार माध्यमाशी बोलताना दिले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!