आरोग्य विषयक

कावली येथील उप प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा साठा अपुरा ; डॉक्टरांची वेळेवर येण्यात अनियमितता ? तर कर्मचाऱ्यांची अरेरावी..

सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह नागरिकांची आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार

धामणगाव रेल्वे –

तालुक्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कावली येथील आरोग्य उप – प्राथमिक केंद्रात सातत्याने औषधाचा साठा उपलब्ध नसून, डॉक्टर वेळेवर येत नसल्याने तसेच कर्मचारी हे अरेरावीची भाषा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांसह नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाबत अवगत केले आहे. तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कावली येथील उप-प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा साठा उपलब्ध नाही, डॉक्टर वेळेवर येत नसून हे नेहमी उशिरा येतात, तसेच कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने सातत्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय हि बाब अत्यंत चिंताजनक असल्याने यावर जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे तसेच डॉक्टरांची येण्याची वेळ सकाळी ८ ते १२ व सायं. ४ ते ५ करण्यात यावी. तसेच अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून सामान्यांना होणार त्रास कमी होईल अशा विषयाचे निवेदन दि. २० मार्च २०२४ रोजी तालुका आरोग्य अधिकारी याना देण्यात आले असून त्याच्या प्रतिलिपी आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी अमरावती यांना देण्यात आल्या आहे.

सदरच्या निवेदनावर सरपंच चंदा रा. जांभळे, उपसरपंच संदीप तु. इंगळे, ग्रा. प. सदस्य कुसुम ब. तेलीग्राम, प्रशांत कि. भोयर, शैलेश सु. टाले, प.स. सदस्य जयश्री भा. ढोले, तसेच गावातील नागरिक गोकुल तु. डोंगरे, अशोक श. सहारे, गणेश भ. राऊत, योगीराज ना. ठाकरे, गजानन सा. पाटील सह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!