प्रतिनिधी – संतोष वाघमारे
राऊतकर सिमेंट चौकट कारखाना, कृष्णा नगर, धामणगाव रेल्वे येथे मोठ्या उत्साहाने श्री प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सकाळी श्री प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन, कलस्थापना, काला, प्रसाद व भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने सुतार समाज बांधवांनी लाभ घेतला.
यावेळी प्रभू विश्वकर्मा महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोळमकर, उपाध्यक्ष अनिल वानखडे, सचिव मुरलीधर मासोदकर, संदीप खानझोडे सदस्य अमरावती जिल्हा सुतार समाज समन्वय समिती, दीपक धनस्कार, अमोल दरवरकर, ओमप्रकाश धनस्कार, दिलीप विलायतकर, पुरूषोत्तम देऊळकर, प्रमोद सोनेकर, मंगेश चांदुरकर, विजय आकोटकर, आनंद आकोटकर, अनुप राऊतकर, संकेत कोळमकर, मधुकर गहूकर यांच्या सहकाऱ्यांनी श्री प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. कार्यक्रमासाठी सुतार समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.
Post Views: 116
Add Comment