जनसूर्या मीडिया
राज्यातील महायुतीच्या जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरु आहे. अशात मागील काही काळात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडले आणि काही नेते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले, यावरूनच राजकीय नेते अनेकदा महायुतीला नेत्यांवर टीका करतांना दिसतात. अशात याच मुद्यावरून आता बिग बॉस मराठी फेम, मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी महायुती सरकारवर जहरी टीका केली आहे. किरण माने विविध विषयांवर परखडपणे आपले मत व्यक्त करत असतो. यावरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील केली जाते. परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करत आपली भूमिका सोशल मीडियावर व्यक्त करत असतात.
Add Comment