सामाजिक

कुऱ्हा येथे शिवजयंती साजरी

प्रतिनिधी – शशांक चौधरी

छत्रपती शिवाजी महाराज हे एक “उत्तम राजा” असून सोबतच अखंड “महाराष्ट्राचे आराध्य दैवत” आहे. आज कुऱ्हा या गावामधे आदर्श अशी पालखी काढण्यात आली. या पालखी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व सोबतच शिवचरित्र देखील ठेवण्यात आल. सर्व प्रथम पालखी काढायच्या आधी शिवरायांचे पूजन केले नंतर पालखी काढण्यास सुरुवात झाली. अती जल्लोष मध्ये ह्या पालखीला गावातील शिवभक्तांनी परिपूर्ण केली. सोबत झेंडे घेऊन व डफली चा तालावर वाजत गाजत शिव पालखी निघाली. शिवाजी महाराजांचे चौका चौकामध्ये पूजन व छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या जयघोषाने झाले. शहिद भगतसिंग सार्व. वाचनालय कुऱ्ह्याचे अध्यक्ष विवेक बिंड व सचिव अमोल भागवत ह्यांनी वाचनालय समोर पूजन केले व आझाद चौक (भोई पुरा) येथे शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन व हारार्पन करण्यात आले.

या सर्व पालखीचे नियोजनामध्ये अक्षय पोकळे, हर्षल दारोकार, शुभम मेश्राम, अक्षय गोठवाल, ऋषिकेश बावणे, कृष्णा जयस्वाल, राहुल राऊत (फॅन्ड्री), ऋषिकेश निंबर्ते, व अभिजीत बाखडे यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शक विजय डहाके, विपुल गोठवाल, स्वप्नील पोकळे हे होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!