सामाजिक कार्यकर्ते सह व्यापारी वर्गाची पोलिसात धाव
धामणगाव रेल्वे
शिक्षणाचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या धामणगाव रेल्वे येथे स्थानिकसह बाहेर गावातून, शहरातून विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. साधारणतः मुख्य शाळासह विद्यालये हे शास्त्री चौक ते अंजनसिंगी रोडवर असल्याने बाहेर गावावरून ये जा करण्यासाठी शास्त्री चौकात विध्यार्थ्यांना बसची वाट पाहावी लागतात. परंतु अनेक महिन्यापासून शास्त्री चौकात शालेय मुलीच्या छेडखानीचे प्रमाण कमी होण्याचे नावच घेत नसून वाढतीवरच आहे. नुकत्याच काही दिवसाअगोदर एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाने मुलीचा हात पकडून तिची छेड काढली. त्याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी कार्यवाही केली असली तरीही या ठिकाणी छेडखानीचे प्रमाण सुरूच असल्याची चर्चा रंगत आहे.
छेडखाणीच्या कारणावरूनच काही वर्षाअगोदर एका मुलीला गमवावा लागला जीव
काही वर्षाअगोदर हुल्लडबाजी तसेच छेडखाणीच्या कारणावरून भर दिवसा या परिसरात निर्घृणपणे एका मुलीचा खून करण्यात आला. त्यामुळे सदरच्या कृत्याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच शालेय मुलींना शास्त्री चौकात सुरक्षितता वाटावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच व्यापारी वर्ग यांनी पुढाकार घेऊन तात्काळ सदरच्या विषयावर लक्ष केंद्रित करून उपाययोजना कराव्या या संदर्भात दत्तापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार याना निवेदन दिले असून त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक याना देण्यात आल्या आहे..
सदरच्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर सह शेकडो व्यापारी वर्गाच्या स्वाक्षरी आहे..
Add Comment