ग्राम पंचायत मंगरूळ दस्तगीर अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
मंगरूळ दस्तगीर –
सातत्याने अभ्यासाच्या प्रवाहात असणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी दरवर्षी ग्रामपंचायत अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही १ फेब्रुवारी पासून ३ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोज़न करण्यात आले आहे.
१ फेब्रुवारी संध्याकाळी ६ : ३० वाजता कार्यक्रमाचे उदघाटन व नागरी सत्कार तर २ तारखेला विद्यार्थ्यांची कलाकृती सादर होणार आहे. तर ३ तारखेला सायंकाळी ६ :३० पासून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असून ७ वाजतापासून ह. भ. प संतोष महाराज भालेराव यांचे समाजप्रबोधन पर भारूड चे आयोजन केले आहे.
सदरचा कार्यक्रम सरपंच सतीश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली असून कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सभापती बेबी उईके, उपसभापती जयश्री शेलोकार, माजी उपसभापती माधुरी दुधे, गटविकास अधिकारी माया वानखडे, उप सरपंच गिरीश सुरोशे, रवी भुतडा अध्यक्ष सेवा सह. सोसायटी, सुरेश निमकर माजी साभापती, राजू डाफ तंटामुक्ती अध्यक्ष, मंगेश काळे उपाध्यक्ष सेवा सह. सोसायटी, पंकज दाभाडे, ठाणेदार मंगरूळ दस्तगीर यांची उपस्थिती राहणार आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच कर्मचारी यांनी केले आहे.
Post Views: 168
Add Comment