जनसूर्या मीडिया
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एका व्यक्तीला दोषी ठरवून १४१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केरळच्या एका न्यायालयाने सुनावली. आई घरी नसताना नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
मंजेरी फास्ट ट्रॅक स्पेशल न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ ए एम यांनी या नराधमाला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा, आयपीसी आणि बाल न्याय कायद्याच्या विविध तरतुदींनुसार एकूण १४१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
तथापि, त्या व्यक्तीला ४० वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल, कारण त्याला दिलेल्या तुरुंगवासाची शिक्षा सर्वोच्च होती आणि २९ नोव्हेंबरच्या न्यायालयाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या शिक्षा एकाच वेळी या व्यक्तीला भोगाव्या लागणार आहेत. शिक्षेशिवाय न्यायालयाने या दोषी व्यक्तीला ७.८५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तसेच, न्यायालयाने पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
दोषी आणि पीडिता हे तामिळनाडूचे रहिवासी असून सावत्र वडील २०१७ पासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते, असे या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका मित्राच्या सल्ल्यानुसार, मुलीने या धक्कादायक घटनेविषयी तिच्या आईला सांगितले आणि आईने पुढे पोलिसांना कळवले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Post Views: 22
Add Comment