सततच्या तगाद्याने महिलेच्या पतीने उचलले होते आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल – आष्टी तालुक्यातील प्रकार
वर्धा/आष्टी (शहीद) :
पुष्पा बालपांडे या महिलेने ग्रामीण कोटा फाईनन्स कंपनी कडून कर्ज घेतले होते आणि ग्रामीण कोटा कंपनीला कर्ज भरणा हप्ते नियमित प्रमाणे वेळेवर हप्ते भरणा करित होत्या. परंतु महिलेचे पती सुरेश बालपांडे यांचा अपघात झाल्यामुळे पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्वरित आपरेशन करण्यासाठी सांगितले. महिला पतीच्या आपरेशन साठी इकडून तिकडे पैसे साठी प्रयत्न करित आहे.
परंतु अशा परिस्थिती मध्ये महिलेला सवलत न देता ग्रामीण कोटा फाईनस कंपनीच्या प्रतिनिधींनीकडून महिलांच्या घरी ऐऊन लोकांचा जमाव करून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यामुळे महिलेच्या पतीने (सुरेश बालपांडे) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही शेजारी असलेल्या लोकांनी धावपड केल्याने जीव वाचविण्याच्या प्रयत्न केला.
पतीच्या जीवाला काही बरेवाईट झाले, तर याला जबाबदार ग्रामीण कोटा फाईनन्स कंपनीचे प्रतिनिधी राहतील अशी तक्रार महिलेकडून पोलीस स्टेशन येथे देण्यात आली..
Post Views: 84
Add Comment