धामणगाव रेल्वे सामाजिक

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद च्या आंदोलनाला धामणगावात शेतकऱ्याचा प्रतिसाद

व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून केले सहकार्य

धामणगाव रेल्वे

शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, जनता, तसेच सुशिक्षीत बेरोजगारांचे मरण, हेच सरकारचे धोरण’ ह्या तत्त्वाने देशाचा कारभार चालविणाऱ्या मोदी प्रणीत भाजपा सरकारच्या विरोधात आज १६ फेब्रुवारीला देशव्यापी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगार, युवावर्ग मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाला.

मोर्चा दरम्यान बंद ठेवण्यात आलेली प्रतिष्ठान

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. मोर्चामधे अनेक शेतकरी स्वत:चे ट्रॅक्टर घेवून सहभागी झाले. मोर्चा मार्गक्रमण करीत असताना शहरातील प्रमुख चौकांमध्ये लालबहाद्दूर शास्त्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व अमर शहीद भगतसिंह ह्या महापुरूषांच्या पुतळ्यांना हारार्पण करण्यात आले.  केन्द्र व राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणा देत तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभाव देणे, शेतकऱ्यांवर विविध मार्गाने लावलेला जीएसटी रद्द करणे, पीकविमासंबंधी जाचक अटी रद्द करणे, ग्रामीण भागातील घरकुलधारकांच्या अनुदानात वाढ करून सामान्यजनांना घरकुलाचा तातडीने लाभ देणे, शेतकऱ्यांचे बंद केलेले राशन तात्काळ सुरू करणे तसेच सार्वजनीक संस्थांचे खाजगीकरण तात्काळ थांबविणे अश्या विविध लोकोपयोगी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.

विविध लोकोपयोगी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना देताना

याप्रसंगी तहसील कार्यालयासमोर भाकपचे समन्वयक कॉ. सुनिल घटाळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे, कृषीरत्न सच्चिदानंद काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एड. चेतन परडखे, (उबाठा) शिवसेना तालुकाप्रमुख निलेश मुंदावणे, माजी तालुकाप्रमुख निलेश तिवारी, कॉ. शाहिर धम्मा खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपील पडघान यांची मोर्चाला उद्देशून समयोचित भाषणे झालीत.

यावेळी राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष विनायकराव होनाडे, शहरकॉग्रेस कमेटी अध्यक्ष प्रदीप मुंधडा, शहरअध्यक्ष (राष्ट्रवादी) मंगेश ठाकरे, शहरकॉंग्रेस कार्याध्यक्ष चंदू डहाणे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष आशिष शिंदे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रशांत बायस्कर, सुधीर शेळके, संजय शेंडे, दिलीप डुबे, राजीव भोगे, तेजकुमार डुबे, डॉ. भगवंत शिंदे, विजय माकोडे, त्र्यंबक पवार, रूपेश गुल्हाने, सुरेश रामगुंडे, भाऊराव बमनोटे, मंगेश बोबडे, मुकुंद माहोरे, अविनाश इंगळे, रामलाल यादव, सत्यनारायण लोया, प्रशांत भेंडे, निलेश चौधरी, संदीप दावेदार, प्रशांत हुडे, दिनकर जगताप, निलेश इंगळे, निलेश ढाले, अमोल कडू,शरद अवचार, गणेश धवने, राजेन्द्र पवार, आशिष भोगे, संतोष पळसापुरे, नितीन शेळके, तुषार कोकाटे, शिशिर शेंडे, अजय तुपसुंदरे, दिवाकर राऊत, अमोल म्हात्रे, मनोज वेरूळकर, विलास डुकरे, निवृत्ती वैद्य, संजय तायडे, राजेश पुरोहित, दिपक कुमरे, अमीत भगत, शुभम ठाकरे, सुभाष लहाबर, रामभाऊ डहाके, विलास धनवीज, भाऊराव अडकणे, वैभव पावडे, शुभम तरोणे, राजाभाऊ मनोहरे, रवि डबले, गोपाळ मांडूळकर, दिपक सदार, प्रवीण काकडे, चंद्रभान तडस, गणेश धोटे, कैलास ठाकरे,संजय टारपे, आशिष गावंडे, बबलू गोपाळ, शुभम चौबे, मयूर डुबे, विशाल राॅय, मनोज तायडे, ऋत्विक इंगळे, तसेच ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी बांधव आयोजीत संयुक्त किसान मोर्च्यामधे सहभागी झाले होते. शैक्षणिक संंस्था व व्यापारी संघटनेने आपापली दुकाने बंद ठेवून मोर्चाला समर्थन देवून सहकार्य केले.
         ‘भारत बंद’ च्या आयोजनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!