धामणगाव रेल्वे –
देशात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला असताना धामणगाव तालुक्यातील रामगाव जिल्हा परिषद शाळेत सुद्दा उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच गणेश उईके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नामदेव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शाळेचे सर्व विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वानी मिळून गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. सम्राट अशोक बुद्ध विहार परिसरामधील सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांसह प्रभातफेरी काढताना शिक्षक सुनिल राठोड, उपस्थित गावकरी
गावातील प्रतिष्ठित नागरिक अजय तुपसुंदरे व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळेमधील संपूर्ण विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना अल्पोहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक सुनील राठोड यांनी केले यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच बहुसंख्या महिला वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते.
Add Comment