Uncategorized

अमरावतीमध्ये येणार अयोध्येतील रामरज (माती) कलश

स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार आणणार पाच तीर्थातील माती

प्रतिनिधी – शशांक  चौधरी

पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू रामलला विधीपूर्वक अयोध्यातील मंदिरात विराजमान झाले. या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याच प्राणप्रतिष्ठेच्या ठिकाणातील माती (रामरज) कलश अमरावतीकरांना दर्शन करण्यासाठी श्री जगगुरु रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार हे शुक्रवार २६ जानेवारीला अमरावतीमध्ये आणणार आहे.

या रामरज कलशमध्ये आयोध्दा येथील पाच पावन ठिकाणांवरील माती आणण्यात येत आहे. यामध्ये राम मंदिर ज्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे तेथील माती, शरयू घाट, संत निवास, हनुमान गडी, व अखंड रामायण पाठ अश्या पाच पावन ठिकाणातील माती माऊली सरकार अमरावतीला घेऊन येणार आहे. ही रामरज कलश जबलपूर , नागपूर, तिवसा मागें अमरावती मध्ये दाखल होणार आहे. ठीक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. आयोधाच्या पावन भूमीचे दर्शन अमरावतीकरांना होणार आहेत. ही माती अमरावती जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये देण्यात येणार आहे.

श्री जगद्गुरु रामानंदचाय स्वामी राजेश्वर माऊली यांना अयोध्यातील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सकल हिंदू समाजातर्फे अंबानगरी ते अवध तेरा तुझको अर्पण या अंतर्गत अमरावती येथून ५०० किलो कुंकू अयोध्याला पाठवण्यात आले होते, हे कुंकू परमपूज्य श्री जगगुरु रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार यांनी रामलला चरणी एक कळस कुंकू अर्पण केला. उर्वरित पाचशे किलो कुंकू हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट ला सुपूर्त करण्यात आले आहे. या दरम्यान राजेश्वर माऊली यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राम मंदिर अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांची भेट घेतली, त्यावेळी महाराष्ट्रातील मंदिर व देशातील मंदिर संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!