शास्त्री चौकातील कार्यालयासमोर नागरीकांना केले मार्गदर्शन
धामणगांव रेल्वे – प्रतिनिधी
जिल्ह्यात सद्यस्तितीत गुन्हेगारीने कळस गाठला आहे. अल्पवयीन मुले भरचौकात देशी कट्टे काढत आहेत. भाजपा इडीची भिती दाकवून आपला पक्ष वाढवित आहे. भाजपाला मतदान करणे म्डणजे भ्रष्टाचाराला वाव देणे आहे. असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेशष विश्वकमा् यांनी मतदारांना संबोधीत करतांना शास्त्री चौकातील कार्यालयासमोर केला.
राज्यकर्त्यांनी चांगली पिढी घडविली पाहीजे आजच्या घडीला युवक गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालला आहे. मात्र भाजपा दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात गुंग आहे धामणगांव रेल्वे मतदार संघात भाजप व कोँग्रेस ने आलटून पालटून सत्ता भोगली मात्र मतदार संघातील समस्या सोडविल्या नाहीत. धामणगांव मतदार संघात सध्या तिहेरी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे, परंतु काँग्रेस नकारात्मक प्रचार करीत आहे. वंचित आघाही मत घेत नाही असे सांगुन लोकांमथद्ये संभ्रम निर्माण करीत आहे मात्र मतदार संघात परिस्थिती वेगळी आहे धामनगांव रेल्वे चांदुर रेल्वे व नांदगांव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातं डोॅ. निलेश विश्वकर्मा यांना मिळत असलेला प्रतिसाद हा काँग्रेस व भाजपच्या जिव्हारी लागत आहे.्यातूनच हे वक्तव्य केले जात आहे असा घणाघात डा: निलेश विश्वकर्मा यांनी केला.
खोटा प्रचार केल्यास वंचित बहुजन आघाडी सुद्दा आक्रमक भुमिका घेईल व जश्यास तसे उत्तर दिल्या जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला मतदानाला केवळ ९ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे कार्यकर्त्यां् घरोघरी जाऊन सिलेंडर ला मत मागावे असे आवाहन डॉ. निले विश्वकर्मा यांनी केले यावेळी मोहोड सी, प्रशांत नाईक किशोर राऊत यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बिरसा मुंडा संघटनेने दिला पाठींबा
वंचित बहुजन आघझाडीचे उमेदवार डॉ.निलेश् विश्वकर्मा यांना बिरसा मुंडा संघटनेने रविवारी, क पत्र देऊन आपला पाठींबा जाहिर केला व बिरसा मुंडा यांचा फोटो देऊन स्वागत केले. यावेळी तळेगांव दशासर, गोंड पुरा येथील संतोष कन्हाडे अमोल कुमरे, श्रीकांत वरठी सनी मेश्राम, अजय धुर्वे आशिष पुरान. देवानंद कन्हारे उमेश कन्हाडे. अभय करपते उपस्थित होते.
Post Views: 24
Add Comment