राजकीय

प्रहारचा चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत प्रचार दौरा सुरु

येरड खरबी या गावी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून निवडणूक प्रचार दौर्‍याला सुरुवात

प्रतिनिधी –

प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती चे अधिकृत उमेदवार प्रविण निळकंठ हेंडवे यांचा शनिवार दिनांक ९ नोव्हेबर रोजी चांदुर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जि.प. सर्कल अंतर्गत प्रचार दौरा आयोजित असून त्यामध्ये घुईखेड, टिटवा, खरबी, येरड, झिबला, चांदुरखेडा, एकलारा, मोगरा, जवळा, धोत्रा, निंभा, बोरी , किरजवळा, राजुरा, बगगी, कळमगाव, कळमजापूर, जावरा, निमगव्हाण, दानापूर, मांजरखेड या गावांचा समावेश आहे तर सकाळपासून सुरु असलेल्या प्रचार दौऱ्यात प्रहार पक्षाला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

चांदुरखेडा येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करताना प्रहारचे उमेदवार तथा पदाधिकारी

                   या दौऱ्या दरम्यान प्रहार जनशक्ती पक्ष घुईखेड सर्कल पदाधिकारी, कार्यकर्ते व परिवर्तन महाशक्ती मित्र पक्षाचे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!