झाडा येथील जिल्हा परिषद शाळा सलग पाचव्यांदा चॅम्पियन
धामणगाव रेल्वे –
तालुक्यातील जुना धामणगाव येथील तालुका क्रिडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात आदर्श यशवंत ग्राम झाडा येथील जिल्हा परिषद शाळेने सलग पाचव्यांदा चॅम्पियन चषक प्राप्त केले. तर माध्यमिक विभागात बोरगाव निस्ताने तर प्राथमिक विभागात जुना धामणगाव जिल्हा परिषद शाळेने अजिंक्य चषक प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला. शिक्षण विभाग पंचायत समितीतर्फे तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन येथील तालुका क्रिडा संकुलात करण्यात आले होते.या महोत्सवाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
सांस्कृतिक मध्ये झाडा तर निदर्शनेमध्ये शेंदूरजना खुर्द शाळेची भरारी
तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती जयश्री शेलोकार, माजी सभापती महादेव सोमोसे, सदस्य माधुरी दुधे, नरेंद्र रामावत, शुभम भोंगे, जयश्री ढोले, राजकुमार केला, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या राधा भूत, गोपाल भूत, गटविकास अधिकारी माया वानखडे, जुना धामणगावचे सरपंच विश्वेश्वर दिघाडे, उपसरपंच हर्षा तायडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या रेखा आमले, सेवानिवृत्त शिक्षक प्रमोद, सुरेखा शिडाम, सुधाकर उईके, अविनाश दुधे व आदी उपस्थित होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक धीरज जवळकार, शिक्षण विस्तार अधिकारी साबीर खान, नारायण अतकरे,सु नील रोंघे, केंद्रप्रमुख तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक जगदीशकुमार शिरसाट, केंद्र प्रमुख डी.एस.राठोड, नरेश पाटील, प्रफुल्ल डाफ व आदी उपस्थित होते.
माध्यमिक विभागात बोरगाव निस्ताने तर प्राथमिकमध्ये जुना धामणगाव चॅम्पियन
प्राथमिक विभागात कबड्डी मुले मध्ये जुना धामणगाव शाळा विजयी ठरली तर निंबोली उपविजयी झाली. कबड्डी मुली मध्ये झाडा विजयी झाली व वसाड शाळा उपविजयी झाली. खो खो मुले मध्ये जुना धामणगाव शाळा विजयी तर शेंदूरजना येथील चमू उपविजयी ठरली. खो खो मुली मध्ये जुना धामणगाव शाळा विजयी व झाडा शाळा उपविजयी झाली. लंगडी मध्ये वरूड बगाजी शाळा विजयी तर शेंदूरजना खुर्द शाळा उपविजयी ठरली. तसेच माध्यमिक विभागात कबड्डी मुले- खेळ प्रकारात हिंगणगाव शाळा विजयी तर शेंदूरजना शाळा उपविजयी ठरली.कबड्डी मुली मध्ये झाडा शाळा विजयी तर बोरगाव निस्ताने शाळा उपविजयी झाली.खो खो मुले खेळ प्रकारात जुना धामणगाव शाळा विजयी तर शेंदुर्जना उपविजयी ठरली.खो खो मुली मध्ये शेंदूरजना विजयी तर गव्हा फरकाडे शाळेची चमू उपविजयी झाली.हॉलीबॉल मुले मध्ये बोरगाव निस्ताने विजयी आणि सोनेगाव शाळा उपविजयी झाली.झाली.हॉलीबॉल मुली गटात बोरगाव निस्ताने विजयी आणि झाडा शाळा उपविजयी झाली. टेनिक्वाईट मुली एकेरी बोरगाव निस्ताने विजयी व झाडा उपविजयी झाले. टेनिक्वाईट दुहेरी मध्ये झाडा विजयी तर बोरगाव निस्ताने उपविजयी झाले.बॅडमिंटन मुली एकेरी मध्ये झाडा शाळा विजयी व बोरगाव निस्ताने उपविजयी झाले. बॅडमिंटन दुहेरी मध्ये बोरगाव निस्ताने विजयी तर झाडा उपविजयी ठरले.निदर्शने मध्ये शेंदूरजना खुर्द शाळेने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक झाडा शाळेने प्राप्त केला. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक झाडा, द्वितीय क्रमांक मंगरूळ उर्दू शाळेने तर प्रोत्साहनपर पारितोषिक शेंदूरजना खुर्द शाळेने पटकाविले.
या सोहळ्याचे प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी केले. संचालन नागसेन रामटेके गौरव खोंडे, विवेक ठाकरे यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी सुनील रोंघे यांनी केले. या सोहळ्यात डॉ. मुकुंदराव पवार सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथ संचालन केले. या महोत्सवात तालुक्यातील जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, सर्वमुख्याध्यापक, शिक्षक, साधनव्यक्ती, विशेष शिक्षक यांनी कर्तव्य बजावले.
Post Views: 403
Add Comment