धामणगाव रेल्वे राजकीय

प्रियंका विश्वकर्मा यांनी घेतले मतदारांचे आशीर्वाद ; शहरात महिलांचा प्रचंड प्रतिसाद

धामणगाव रेल्वे 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराची रणधुमाळी त्यांच्या अर्धांगिनी प्रियंका विश्वकर्मा यांनी सांभाळत धामणगाव शहर पिंजून काढले असून त्यांनी घरोघरी जाऊन सिलेंडरसाठी मत मागितले आहे. यावेळी शहरातील महिला व पुरुष मतदारांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद देऊन विजय करण्याचे आश्वासन दिले आहे. धामणगाव रेल्वे शहरात प्रचार रॅली दरम्यान प्रियंका विश्वकर्मा यांनी शहरातील साईनगर शास्त्री चौक, गवळीपुरा, रुक्मिणी नगर, अरिहंत नगर, श्रीकृष्ण पेठ चिंतामणी नगर, दाल मिल चाळ परिसर, आंबेडकर नगर, गांधी चौक पांडे नगर, आदर्श कॉलनी परिसर तुळजाभवानी मंदिर सर्कल या भागातून पदयात्रा काढली. नागरिकांनी त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद दिला तसेच जागोजागी स्वागत करण्यात आले.

प्रियंका विश्वकर्मा यांनी डॉ. निलेश विश्वकर्मा यांची मत देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचे मत मतदारांना समोर मांडले. धामणगाव रेल्वे मतदार संघ विविध योजना आणून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रियंका विश्वकर्मा यांनी मतदारांना दिले. 

भाजप व काँग्रेस यांनी अंतिम पालटून सत्ता भोगून गरीब जनतेवर अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी कमिशन खोर सरकारला खाली खेचण्यासाठी एकत्र येऊन डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मतदान करण्याचे आवाहन सुद्धा प्रियंका विश्वकर्मा यांनी केला आहे. शहरात करण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. निलेश विश्वकर्मा यांची उमेदवारी राजकारण नसून जनसामान्यांना न्याय देण्याकरिता व मतदार संघाचा विकास करन्याकरिता आहे.. असे प्रचार रॅली दरम्यान प्रियंका विश्वकर्मा यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते.

धामणगावात वंचित बहुजन आघाडी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

शहरातील शास्त्री चौक येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रकाश विश्वकर्मा, जी.पी विश्वकर्मा यांनी फित कापून केले. यावेळी धामणगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत नाईक तसेच पदाधिकारी प्रल्हाद कोहडे, सागर ढोले, सुरेंद्र फुसाटे, महेश विश्वकर्मा, ओम प्रकाश विश्वकर्मा राजू फुसाटे, सौ. सारिका ढानके, रत्ना रंगारी, संतोष विश्वकर्मा आदी उपस्थित होते…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!