अमरावती

जिल्हा स्तरीय शालेय सांस्कृतिक महोत्सवात दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे यशस्वी आयोजन

अमरावती-

  जिल्हा स्तरीय शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या पटांगणात सुरू आहे. दरम्यान सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये एकांकिका, नाटिका, भावगीत, लोकगीत, सिनेगीत, समुह गीत, एकल गीत, अभिनय, हास्य जत्रा, निदर्शने असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे शालेय विद्यार्थी अभिजात कलेचा आविष्कार करीत आहे. या शालेय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहापात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, प्राथमिक विभागाचे, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी सैय्यद राजिक, उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने, गजाला नाजली ई.खान, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, धनंजय वानखडे, दिपक कोकतरे, डाॅ.नितिन उंडे, प्राचार्य गगांधर मोहने, डी.सी.गायकवाड,प्रमिला शेंडे,रजनी शिरभाते, निखील मानकर, आश्विन मानकर, संगिता सोनोने, नंदकिशोर खरात, रामेश्वर माळवे, गुणवंत वरघट, आर.एस.निंभेकर, राजेश नाईक, संतोष घुगे, अशफाक अ.रज्जाक, ज्ञानेश्वर गिरी, क्रीडा संयोजक व शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण खांडेकर हे व्यासपिठावर उपस्थित होते.

विभागीय क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांनी सादर केला कलेचा आविष्कार

दरम्यान सांस्कतिक कार्यक्रमामध्ये मोर्शी, नांदगाव खंडे, चांदुर रेल्वे, चांदुर बाजार, दर्यापूर,अंजनगाव सूर्जी, धामणगावरेल्वे, अमरावती, वरुड, तिवसा, चिखलदरा, भातकुली, धारणी, अचलपूर या पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांनी आपला कलेचा आविष्कार सादर केला. या कार्यक्रमाचे संचालन शेख शकील, वनिता बोरेडे, शैलेश दहातोंडे, शीला मसराम यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ. मनोज उज्जैनकर, प्रा.विश्वनाथ निळे व वैभावी गोळे यांनी कर्तव्य बजावले. असे क्रिडा महोत्सवाच्या प्रसिध्दी समितीचे राजेश सावरकर, शकील अहमद, विनायक लकडे यांनी कळविले आहे.

शुक्रवार ला होणार पारितोषिक वितरण सोहळा  

सदरच्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा (ता.९) शुक्रवारला होणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा हे भुषवतील. तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, डी.आर.डी.ए.च्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख विभागीय क्रीडा संचालक विजय संतान, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित राहणार आहे.
सांघिक व वैयक्तीक स्पर्धा मध्ये प्राथमिक विभागात-  सांघिक खेळात- कबड्डी (मुले), कबड्डी (मुली), खो-खो (मुले), खो-खो (मुली) लंगडी मुली,
वैयक्तिक स्पर्धेत – ७५ मी. धावणे (मुले),  (मुली),  लांब उडी (मुले), (मुली), उंच उडी (मुले), (मुली), दोरीवरील उडया (मुली)
माध्यमिक विभागात  सांघिक खेळात- कबड्डी (मुले), (मुली),खो-खो (मुले), (मुली), व्हॉलिबॉल (मुले), (मुली), टेनिक्वाइड दुहेरी (मुली), बॅडमिंटन दुहेरी (मुले), (मुली)१००*४ रिले (मुले) (मुली) हे खेळ होते.
वैयक्तिक स्पर्धेत- १०० मी. धावणे (मुले), (मुली), लांब उडी (मुले), (मुली), उंच उडी (मुले), (मुली), कुस्ती (मुले), गोळा फेक (मुले), टेनिक्वाइड (मुली) हे खेळ प्रकार होते. या प्रकारातील यशवंत खेळाडू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारला (ता.९) पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!