Uncategorized

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध – प्रशांत मुन, रिपाई जिल्हा संघटक 

 

धामणगाव रेल्वे –

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचे कृतघ्न अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी दिली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच नागपुरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना न्यायपालिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण न ठेऊन ८० टक्के बहुजन समाजावर अन्याय केला आहे असे अत्यंत चुकीचे कृतघ्न उद्गार काढून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व दलित शोषित पीडित अल्पसंख्यांक ओबीसी आणि महिला आणि सर्व समाज घटकांचे कल्याण करणारे संविधान देशाला दिले आहे. आरक्षणाच्या तत्वातून केवळ अनुसूचित जाती जमाती नव्हे तर ओबीसींचे ही कल्याण केले आहे. मात्र समाजासमोर बोलताना जितेंद्र आव्हाड कोणतेही ताळतंत्र न ठेवता बोलत असून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामात चुकी काढण्याचा कृतघ्नपणा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे प्रशांत मुन म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे वक्तव्य असून त्या विरुद्ध आंबेडकरी जनतेत तीव्र संताप निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!