नांदगाव येथील जाहीर सभेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित
नांदगाव खंडेश्वर – प्रतिनिधी
मुसलमानांनी लोकसभेत काँग्रेसला भरभरून मते दिली मात्र, एन आर सी सी कायदा रद्द करीत नाही. फक्त मतासाठी उपयोग करून घेतात मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जातो कायदा रद्द करायचा असेल तर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्या काँग्रेसच्या चमच्या पासून सावध राहा असा खणखणीत इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नांदगाव खंडेश्वर येथील जाहीर सभेत केला.
एन आर सी सी मुस्लिमांचा प्रश्न नाही तर इतर ओबीसी जातींचाही प्रश्न आहे मुस्लिम काँग्रेस सोबत जातात एन आर सी सी बाबत त्यांच्याकडे काही निकाल लागला नाही. भाजपाने बचेंगे तो कटिंग घे हा नारा दिला काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना कापील असे भाजपा म्हणत आहे, परंतु ओबीसी ने लक्षात ठेवा हे सर्व थोटांग आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजपवाले घेत नाही निवडणुका झाल्या तरी २७ टक्के आरक्षण लागू होणार नाही त्याचा निर्णय आहे. या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्यायचे आहे राज्यात किमान २५ आमदार निवडून येणे आवश्यक आहे कुणाचेही सरकार आले तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घ्यावा लागेल त्याशिवाय सरकार बसणार नाही. मतदार संघातील एक एक मत खेचून आणा तेव्हाच आपला आमदार निवडून येईल पैगंबरा बाबत उलटे सुटे बोलण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही निपुण शर्मा महिलेने वादग्रस्त विधान केले होते तरी पण मुस्लिम समाज त्यांच्याच मागे आहे.
Add Comment