मुबई : जनसूर्या मीडिया
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमधील हिंसाचार प्रकरण आणि पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्याशी संबंधित प्रकरणावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सकाळी सागर बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले होते. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा केली. परभणीच्या विषयावर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ही भेट महत्त्वाची समजली जात आहे. परभणीच्या मुद्यावर प्रकाश आंबेडकर यांनी काही महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी काही मागण्या केल्या.> परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी;
> सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या;
> परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा;
> 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत,
> आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.
परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.
Post Views: 1
Add Comment