राजकीय

मतदासंघातील विकासासाठी राजकीय परिवर्तन आवश्यक – वीरेंद्र जगताप

धामणगाव रेल्वे –

         धामणगाव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने जन आशीर्वाद यात्रा तथा सभेचे आयोजन करण्यात आले. खर्डा, सोनेगाव, निंभोरा (बोडखा), झाडगाव, आष्टा, निंबोली, चिंचोली, येरली, मंगरूळ या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी गावातील तथा मतदारसंघातील जनतेने वेगवेगळ्या समस्येवर चर्चा केली. ग्रामीण भागातील जनता महागाईने त्रस्त आहे. घरकुलाचे प्रश्न अजूनही कायम आहे.
महविकास आघाडीचे सरकार जनतेचे समस्या नक्की सोडवेल. या दूरदृष्टीने जनतेने महविकास आघाडीच्या सरकारवर विश्वास दर्शविला. या जन आशीर्वाद यात्रे च्या माध्यमातून प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी त्यांना आश्वासित केले. यातून सर्व जनतेच्या कल्याणकारी हित साधले जाईल. जनतेकडून या जन आशीर्वाद यात्रेला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!