पुणे जनसूर्या मीडिया
चौकात नागरिकांना अडवून त्यांच्याकडे धमकावून पैशांची मागणी करत त्रास देणाऱ्या तृतीय पंथ्यावर आता पोलीस कारवाई केली जाईल असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत.
तृतीयपंथीय, तसेच भिक्षेकरी खासगी कार्यक्रम, विवाहाच्या ठिकाणी जाऊन पैसे मागतात. पैसे न दिल्यास संबंधितांना धमकावतात. शहरातील प्रमुख चौकात वाहनचालकांना अडवून पैसे मागितले जातात. पैसे न दिल्यास मोटारीच्या काचा वाजवितात.
अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. नागरिकांना धमकावून कोणी पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्यास तृतीय पंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणी, बेकायदा जमाव, नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील प्रमुख चौक, खासगी कार्यक्रमात शिरून पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश येत्या शुक्रवार (दि.१२) लागू करण्यात येणार आहे. याबाबत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
Post Views: 67
Add Comment