मुंबई पोलिसांनी चांगलीच घडवली अद्दल
मुबई ( जनसूर्या मीडिया ) :
विमानात एका प्रवाशानं चक्क बीडी ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला याची दखल थेट पोलिसांनी घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टात हजर केलं. कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, मोहम्मद फकरुद्दीन मोहम्मद अमरुद्दीन (वय ४२) असं या प्रवाशाचं नाव असून त्यानं मुंबईहून उड्डाण करणाऱ्या विमानात बिडी शिलगावली. अशा प्रकारे विमानात सिगारेट किंवा बिडीच नव्हे तर कुठलंही लाईटर किंवा काडेपेटी सारखं ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असतानाही हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मुंबईच्या सहार पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर भादंवि ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एअरक्राफ्ट अॅक्ट अंतर्गत संबंधित गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. यानंतर आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
Post Views: 57
Add Comment