माझ्या धाकटा भाऊ प्रताप अडसड ला विधिमंडळात पाठवा, विकासाच अभिवचन मी देतेय -पंकजा मुंडे
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी
मतदारसंघाची विकास करण्याची प्रचंड शक्ती प्रताप अडसड यांच्यात आहे माझ्या धाकट्या भावाला विधिमंडळात पाठवा या मतदारसंघाचा विकासाचे अभिवचन मी आपल्याला देते असे मत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले
धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेला प्रचंड जनसागर उसळला होता आयोजित प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे विज बिल झिरो केले ,लाडक्या बहिणीच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा झाले, कृषी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला कृषी मालाचे वीस टक्के भावांतर सरकारने जाहीर केले फरकाची रक्कम सरकार देणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारांचे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असे म्हणत त्यांना प्रश्न विचारा असेही मुंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
नांदगावच्या प्रचार सभेत उफाळला जनसागर
मतदारसंघातील पंधरा वर्षाचा दडपशाहीचा कारभार आणि पाच वर्षाचा माझा कार्यकाळ यात आपण फरक पाहिला आहे शेतकऱ्यांना दारू पाहिजे, शेतकरी महिला खररा खातात असे वारंवार विधान माजी लोकप्रतिनिधी करीत आहे. अशा माणसाला आपण मतदान देणार काय असा सवाल प्रताप अडसड यांनी केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अडीच वर्षात कोट्यावधीची कामे आणली पाच वर्षात या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द मी आपल्याला देतो असे आ. अडसड म्हणाले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की काँग्रेस हे जळत घर आहे त्यापासून सावध राहावे अनेक दलित बांधवांना याचा अनुभव आला आहे अडीच वर्षात मतदार संघात दलित वस्त्यांचा विकास मी केला दलित बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मंचावर पुरुषोत्तम बनसोड चरणदास इंगोले, प्रशांत मून, रमजान अन्सारी, शेख कयूम, हरिचंद्र खंडाळकर, राजेश पाठक, घनश्याम सारडा, रवींद्र मुंदे, सुरेश गायधनी, सुरेखा शिंदे, उषा तीनखेडे, जयंत डेहनकर, नीकेत ठाकरे भास्कर तुपकर, राजू हजारे, उषा तीनखेडे, यांची उपस्थिती होती संचालन रवी उपाध्याय तर आभार मनोज डहाके यांनी केले.
Post Views: 23
Add Comment