संघटित युवा पत्रकार संघटना तसेच गौरक्षा मंचच्या वतीने बेकायदेशीररीत्या बुकिंग तसेच अवैधरित्या रेती वाहतूकदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन
धामणगाव रेल्वे –
जळगाव मंगरूळ ला सुरु झालेला रेती डेपो हा सर्व सामन्यासाठी नसून त्याचा फायदा रेती डेपो मालक तसेच त्यांचे सहकारीच घेत असल्याची ओरड तालुक्यात चांगलीच रंगली असताना त्याची प्रचिती २९ फेब्रुवारी रोजी एकाच रात्रीतूनच हजारो ब्रास रेती बुक झाल्याने दिसून आले. एकंदरीत गरीब गरजू व्यक्तींना रेती बुक कधी होते आणि संपते कधी याची माहितीच होत नसल्याने तसेच रेती दलालाच्या मनमानी कारभाराने सकाळी ५ वाजतापासून एकाच रॉयल्टी वर अनेक विनापसिंग गाड्याची अवैध वाहतूक होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तर रेती डेपो मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार सुरु असल्याकारणाने त्या भ्रस्टाचाराला आळा बसावा यासाठी संघटित युवा पत्रकार संघटना तसेच गौरक्षा मंच च्या वतीने दि. ०४ मार्च २४ रोजी तहसिदार गोविंद वाकडे याना निवेदन देऊन रेती डेपोत सुरु असलेल्या भोंगळ कारभाराची, रेती डेपो मालक तसेच त्यांचे सहकारी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून सदर प्रकरणावर तात्काळ ३ दिवसाच्या आत दखल न घेतल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रेती बुकिंग झालेल्या व्यक्तीकडे रेती न पोहोचल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार – तहसीलदार, गोविंद वाकडे
रेती डेपोत सुरु असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात संघटित युवा पत्रकार संघटना तसेच गौरक्षा मंच च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार याना भेटून कशा पद्धतीने शासनाचा महसूल बुडवल्या जात आहे तर ज्या व्यक्तीने रेती बुकिंग केली त्याच्या घरी रेतीच पोहचत नसल्याचे वास्तव तहसीलदारासमोर मांडले. त्यावर तहसिदार यांनी सुद्दा सदरच्या बाबीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच रेतीची आवश्यकता नसताना कुणीही रेती बुकिंग साठी कागदपत्रे तसेच ओटीपी मागितल्यास त्यांना देऊ नये असे आवाहन केले आहे.
निवेदन देतेवेळी संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे, उपाध्यक्ष संतोष वाघमारे, सचिव पवन बहाड, कोषाध्यक्ष सुरज वानखडे, सदस्य सचिन मुन, शशांक चौधरी, गजानन फिरके, अनिल शर्मा गौरक्षा मंच चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हितेश गोरिया, चेतन कोठारी, स्वा. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता अतुल भुजाडणे, सामाजिक कार्यकर्ता बाबा ठाकूर व इतर नागरिक उपस्थित होते.
Post Views: 63
Add Comment