गावठाण, महसूल, सार्वजनिक बांधकाम, तसेच खाजगी मालकीच्या जाग्यावरही माजी सरपंचाचे अतिक्रमण ?
धामणगाव रेल्वे –
काही दिवस अगोदर गावालगत असलेल्या शेतीला लोखंडी पोल व तार कंपाउंड घालून गावठाण तसेच सार्वजनिक विभाग अंतर्गत येत असलेल्या जागेवर विरळ रोंघे येथील माजी सरपंच अतिक्रमण करीत असल्याची ग्रा. प. सदस्य यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र माजी सरपंच यांच्यावर त्या तक्रारीचा काहीच फरक पडल्याचा दिसून आला नसून गावठाण जाग्यावर कॉलम चे गड्डे करून पक्के बांधकाम माजी सरपंच करीत आहे.
तरोडा गुंजी प्रजिमा १७ सार्वजनिक बांधकाम विभाग चा. रेल्वे रोडवर केलेले अतिक्रमण
मिळालेल्या माहितीनुसार फक्त गावठाण आणि सार्वजनिक बांधकाम अंतर्गत येत असलेल्या जागेवरच नाही तर महसूल विभागामधील जागेवर आणि एका खाजगी व्यक्तीच्या शेतात सुद्धा माजी सरपंच अतुल वाघ यांनी तार कंपाउंड टाकून अतिक्रमण केल्याची माहिती समोर येत आहे तर या संदर्भात वार्ड क्र. ३ येथील असंख्य नागरिकांनी सुद्धा या अतिक्रमणाबाबत संबंधित विभागाला तक्रार केलेली आहे तर खासगी शेत मालक यांनी सुद्धा पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाला तक्रार केली आहे.
मंडोधरी नदी कडे जाणाऱ्या पांदन रस्ता महसूल विभाग जागेवर केलेले अतिक्रमण
हम करे सो कायदा च्या तोऱ्यात असलेल्या माजी सरपंचाला पाठबळ कुणाचे ?
विरळ रोंघे येथील माजी सरपंच यांनी विविध विभागातील शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी असताना सुद्दा माजी सरपंचाकडून बांधकाम थांबविण्या ऐवजी तिथे पक्के बांधकाम सुरु असल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे माजी सरपंचाला नेमके पाठबळ कुणाचे हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. तार दुसरीकडे काहींच्या मते सातत्याने ग्रा. प. मध्ये हस्तक्षेप असल्याकारणाने ग्रा. प. प्रशासनाचेच माजी सरपंचाला पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे.
खासगी शेत मालक प्रकाश रोंघे यांच्या गट नं. ३ मध्ये केलेले अतिक्रमण
Add Comment