सामाजिक

सुशिल बेले यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य शिबिरार्थीनी आरोग्य शिबिराचा घेतला लाभ

जनतेचा भरघोस प्रतिसाद, ३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान….

वरूड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर

आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सुरेशरावजी बेले यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १८ में रोज शनिवारला भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते पुसला आदिवासी भवन आठवडी बाजार येथील आरोग्य शिबीराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला यावेळी आरोग्य शिबिरात उपस्थित तज्ञ डॉ. अरविंद बडगरे, डॉ सौरभ आंडे, डॉ. शशीभूषण घाटोळे, डॉ. पंकज सुरजुसे, डॉ चंद्रशेखर बासुंदे, डॉ सौरभ पोहरकर, डॉ रणधीर घोरपडे या सर्वांनी पुसला येथील आदिवासी भवन मध्ये अनेक रुग्ण तपासून त्यांना आरोग्य सेवा दिली.

त्यावेळी उपस्थीत संपूर्ण डॉक्टर टीमचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले, डॉक्टरांनी व तेथील रुग्णांनी आणि आक्रोश जनशक्ती संघटना पूसला सर्कलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि मित्र मंडळातर्फे केक कापून सुशील बेले यांचे वाढदिवस साजरा केला तसेच वरुड येथील काठीवाले सभागृहामध्ये रक्तदान शिबिर व मोर्शी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सुमित रवींद्रजी बिस्वास (चांदसी हॉस्पिटल मोर्शी ) पाईल्स तज्ञ मुळव्याध, फिशर, भगंदर, यासारखे अनेक रोगांची मोफत तपासणी केली. शिबिरामध्ये अनेक गरजू रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घेतला तसेच डॉक्टर सुमित बिस्वास यांचा आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सुशील बेले मित्र परिवार व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला यावेळी शहरातील अनेक पदाधिकारी व मोर्शी मतदार संघातील कार्यकर्ते व मित्र मित्रमंडळींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या एकूणच पुसला आणि वरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या आयोजकांचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यक्रत्याचे, रक्तदात्यांचे तसेच शिबिरात सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे सुशील बेले यांनी खुप आभार मानले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!