सामाजिक

परसोडी बुद्ध विहारात रमाई जयंती निमित्त बुद्ध, भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम संपन्न

सिद्धार्थ नवयुवक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

धामणगाव रेल्वे –

बुद्ध, भीम गीताच्या कार्यक्रमातुन त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती परसोडी बुद्ध विहारात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. सिद्धार्थ नवयुवक मंडळाने रमाई जयंतीच्या निम्मिताने ७ फेब्रुवारी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या फोटोचे पूजन व हारार्पण प्रभाबाई बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर गीत गायनाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला गायक रुपचंदजी गुजर, अमोल हटकर यांनी आपल्या गायनातून माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सारांश उपस्थितांसमोर मांडला तर त्यांना तेवढीच साथ बँजो मास्टर दानिश पोपटकर, तबला मास्टर महिंद्रा पाटिल, ढोलक मास्टर रवी मेश्राम, पडूळकर, हार्मोनियम मास्टर सुपकरण पाटिल यांनी दिली.

यावेळी बेबीताई ढाले, रेखाताई कांबळे, ललताताई गणवीर, वैशालीताई बनसोड, अल्काताई कवाडे, वैशाली भगत लटूदासजी गुजर, श्याम सोमकुवर, रोशन पाटिल, ललित पाटिल, कुणाल गणवीर, निखिल कवाडे, अनिकेत रामटेके, विश्व्जीत थुल, साहिल कवाडे, उदय भगत सह मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनीताताई दिघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बबिताताई सोमकुवर यांनी मानले.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!