सामाजिक

कर्मयोगी फाऊंडेशन च्या वतीने सावळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, विधवा ताईचा साडीचोळी देऊन सन्मान

धामणगाव रेल्वे – सचिन मुन

कर्मयोगी फाउंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्त्वावर कर्मयोगी फाऊंडेशन बऱ्याच काळापासून आपले सामाजिक उपक्रम राबवत असून या कर्मयोगी फाउंडेशन तर्फे प्रत्येक महिन्याला कूबडी वाटप तर गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप करत असतात. कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळा येथील ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ५० महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकाराचा सत्कार करण्यात आला सत्कारमुर्ती म्हणून संतोष वाघमारे, गजानन ‌फिरके, सचिन मुन, राहुल चौधरी, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

               कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष विजेंद्र दरवडकर सरपंच, कर्मयोगी फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष विनोद तितरे, राजु निस्ताने, विजय पाटील, विवेक गुडधे,व ग्रामपंचायत चे सचिव चौधरी,अमिता ठोंबरे, उपसरपंच सदस्य संघरक्षित पूनवटकर, गजानन ठाकरे, प्रदीप पोरताके, बेबीबाई तितरे, उमाबाई कन्नाके, स्वातीताई दरवडकर, निशाताई गांधी, व ग्रामपंचायत चे कर्मचारी अमोल महिले, संदेश कंगाले व गावातील नागरिक बचतगटाच्या महिला CRP, ICRP मोठ्या संख्येने उपस्थित होते..

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!