शैक्षणिक

देशासाठी मरणेच नाही तर देशासाठी जगणे म्हणजे देखील देशसेवा – डॉ. विशाल मोकाशे

प्रतिनिधी – शशांक चौधरी

कला व विज्ञान महाविद्यालय कु-हाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा आज तिसरा दिवस बौद्धिक सत्रात डॉ. विशाल मोकाशे आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिकतेची भावना निर्माण होऊन तो खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक बनू शकतो असे शिबिर नियमित होणे हे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात करावा असे मत डॉ. विशाल मोकाशे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे आहे महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे सोबतच ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे प्रौढ शिक्षण गलिच्छ वस्ती साफसफाई नागरिक संरक्षण इत्यादी कार्यक्रम आपण करत असतो.सोबतच देशाचा सैनिक देशासाठी आपले प्राण देऊन सामाजिक जाणीव व्यक्त करतो व देशभक्ती व्यक्त करतो परंतु समाजातील प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्राण देवू शकत नाही. पण देशासाठी जगणे म्हणजे देखील देशसेवा आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक चौधरी याने केले तर आभार प्रदर्शन कु. दिव्या सहारे हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व वंदेमातरम या गीताने झाली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!