Uncategorized

नवभारत फर्टीलायझर लिमिटेड कंपनीतर्फे चिंचोली गवळी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी –

नवभारत फर्टीलायझर लि. कंपनी कडून चिंचोली गवळी येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा, चिंचोली गवळी ता.मोर्शी जि.अमरावती येथे प्रजासत्ताक दिन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग व गावकरी मंडळी यांच्यासोबत साजरा करण्यात आला. त्यावेळी नवभारत कंपनी कडून विध्यार्थ्यांना खाऊ वाटप केला, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शाळेला भेट वस्तू देण्यात आले.

प्रमुख पाहुणे गावचे सरपंच राजाभाऊ हटकर, उपसरपंच विक्रम राऊत, दिनेश उंबरकर, उमेश बोहरपी, पोकळे उपस्थित होते व त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मुंदाने यांचा सत्कार कंपनी कडून घेण्यात आला त्यावेळी कंपनी चे अधिकारी आशिष सोनोने, अक्षय सोलव, सचिन गंजीवाले, अमित ठाकरे व सर्व गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!