परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी : प्रवीण गुडधे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील स्थानिक नायगाव शेत शिवारात अगदी गावाजवळ असलेल्या उपसरपंच उमेश शिसोदे व सुधीर भगत यांच्या शेतातील कालवड आणि बकरीची शिकार वाघाने केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, उन्हाळ्याच्या दिवसात जनावरे शेतात बांधतात, नेहमी प्रमाणे जनावरे बांधून दहा वाजताच्या सुमारास पाण्याचे वातावरण असल्याने दोन्ही शेतकरी घरी गेले असता ११ वाजताच्या सुमारास वाघाने कालवड व बकरीची शिकार केली आहे.
वाघाने केलेली कालवड आणि बकरीची शिकार
गेल्या अनेक वर्षापासून दिघी महल्ले, नायगांव शिवारात वाघ असल्याची चर्चा होती, कित्येक शेतकऱ्यांना, मजुरांना, शालेय विद्यार्थ्यांना ह्या वाघाने दर्शन दिले, दीड महिन्या आधी मंगरुळ दस्तगीर दिघी महल्ले शिवारात बीबट चे बझडे आढळले, दोन वर्षा आधी निमकर नामक व्यक्तीवर वाघाने हल्ला केला होता, त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षा पासून या परिसरातील लोक वाघाच्या भीती खाली आहे. कुठलीही मोठी जीवितहानी होण्याची वाट वनविभागाने न बघता या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी वनविभागाला केली आहे.
वनविभागाला माहिती दिली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्या असल्याचे शेतकरी यांनी सांगितले. तर वृत्त लिहिस्तोवर वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली नव्हती…
गेल्या काही वर्षा पासून परिसरात वाघाची चर्चा होती. मात्र काल अचानक वाघाने कालवड वर हल्ला केला, असल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे – उमेश शिसोदे, शेतकरी
Add Comment