क्राईम

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय पोटच्या मुलीचा प्रियकराच्या मदतीने खून

मुलीच्या शरीरावर आगीचे चटके दिसल्याने आला संशय

खापरखेडा : जनसूर्या मीडिया

अनैतिक संबंधातून प्रेमात रुपांतर झालेल्या जन्मदात्या आईला पोटची मुलगी नकोशी होती. प्रेमात अखंड डुबलेल्या आईने प्रियकराच्या मदतीने तीन वर्षांच्या मुलीचा खून केला. ही घटना स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील नांदा शिवारात २ जानेवारीला उघडकीस आली. गुनिता ताराचंद चामलाटे (वय २९ वर्षे, रा. नांदा) व तिचा प्रियकर राजपाल मालवीय (वय ३२ वर्षे, रा. देवास) अशी आरोपींची नावे आहेत.
मानसी चामलाटे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. गुनिता कामानिमित्त खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील नांदा शिवारात आली होती. यादरम्यान मध्य प्रदेश देवास येथील प्रियकर राजपाल मालवीय याच्याशी सूत जुळले. मात्र, दोघांनाही मुलगी मानसी नकोशी होती. नांदा येथील राहत्या घरी गुनिता व राजपालने २६ डिसेंबरला मानसीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने व हाताने मारून निर्घृण हत्या केली. या हत्येचे बिंग फुटणार या भीतीपोटी गुनिता मुलगी मानसीला पती ताराचंद यांच्याकडे गोरेगावला नेले. दरम्यान, ताराचंद व त्याची दुसरी पत्नी कल्पनाला मानसी खाली पडून डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

शरीरावर दिसले आगीचे चटके

अंत्यविधी दरम्यान आंघोळ करताना मानसीचे वडील ताराचंद व सावत्र आई कल्पनाला शंका आली. यावेळी त्यांना मानसीच्या डोक्यावर आणि शरीरावर मार दिसला. मानसीच्या शरीरावर आगीचे चटके दिसून आले. हा प्रकार पाहून तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय झाला. मात्र, त्यावेळी ते काहीही बोलले नाही. मानसीचा मृतदेह जमिनीत पुरून अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकांनी मुलीची हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त केला होता. मात्र, तपासानंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!