धामणगाव रेल्वे

कावली वसाड परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ; एकात्मतेचा दिला संदेश

धामणगाव रेल्वे –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहामधे साजरी होते त्यातील एक भाग म्हणून तालुक्यातील कावली वसाड परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली. वसाड येथे नवयुवक पंचशील मंडळातर्फे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ हेंडवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार प्रा. गुलाब मेश्राम, गावाच्या सरपंच मायाताई हेंबाडे, उपसरपंच संगीताताई गवई तसेच पोलीस पाटील वैशालीताई साव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना गझलकार प्रा. गुलाब मेश्राम म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र सांगत बसले तर दिवस सुद्धा अपुरा पडतो परंतु त्यांनी एकट्या समाजासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी काम केले म्हणून ते बोधिसत्व झाले.
अध्यक्षीय भाषणात सिद्धार्थ हेंडवे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचा खरा मित्र जर कोणी असेल तर ते पुस्तक होते म्हणून त्यांनी ग्रंथासोबत मैत्री केली आणि त्यामुळे या देशाच्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता हा विचार त्यांनी त्यामध्ये टाकला म्हणून बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांना वाचल पाहिजे. वाचाल तर वाचाल.
वाचन करणे ही काळाची गरज आहे तेव्हाच आपल्याला खरा अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली ठरेल म्हणून प्रत्येकाने वाचन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी आव्हान केले. या कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक गजानन गवई यांनी केले तसेच संचालन गौरव मनवर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन टाले यांनी केली.
तसेच संपूर्ण गावांमधून रॅली काढून एकात्मतेचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून दिला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!