महाराष्ट्र कामगार मंडळ कल्याण केंद्र धामणगाव रेल्वेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
धामणगाव रेल्वे –
सततच्या कामाने नागरिक शारीरिक सह मानसिक तणावात जातो. सातत्याने कामाची दिनचर्या सुरु असल्याने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देता फक्त काम आणि कामात गुंतलेला माणूस मानसिक तणावात गेल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे धामणगाव रेल्वे येथील भगतसिंग चौक येथील कॉम्पलेक्स मध्ये महाराष्ट्र कामगार मंडळ कल्याण केंद्र धामणगाव रेल्वेच्या वतीने मानसिक ताणतणाव मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मानसिक ताणतणाव मार्गदर्शन कार्येक्रमाला सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड अकोला विभाग, सौ प्रतिभा भाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, सदरच्या कार्यक्रमाला संचालक विनोद इंगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विनीकुमार लांजेवार तिकीट निरीक्षक रेल्वे विभाग, प्रमूख पाहुणे भूषण कांडलकर, येशुदास खोब्रागडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून प्रफुल सम्रित, सौ मीराताई बाळवाईक. यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
प्रमुख वक्ते प्रफुल सम्रित यांनी आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर स्वस्थ व मनःशांती कशी प्राप्त करावी, त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ध्यान करणे होय. असे योग्यरीत्या समजून सांगितले तसेच उस्थितीतांना ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले
यावेळी सदरच्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांची उपस्थिती असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी गवई, अनिता गजभिये, रानु कटारे, रुपाली घरडे, महेक खान, पुनम कांडलकर, पायल वानखेडे, सोनिया धर्मेंद्र कुमार,सोनाली लांजेवार, प्रतीक्षा प्रजापती, यांनी विशेष मेहनत घेतली.
Add Comment