सामाजिक

धामणगाव परिसरातील बेवारस मृतदेहाला मातोश्री फाउंडेशन ने दिला खांदा

एकाच आठवड्यात दोन बेवारस मृतदेहावर मातोश्री फाउंडेशन ने केले अंतिम संस्कार

धामणगाव रेल्वे:-

परिसरातील यवतमाळ बायपास रोडवर दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी यवतमाळ रोडवरील गोडाऊन परिसरात एक अनोळखी पुरुष जातीचे निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेले अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेले शरीर धामणगाव पोलिसांना आढळून आले.

सदर अर्धवट मृतदेह धामणगाव रेल्वे येथे सापडल्यानंतर परिसरात अनेक शंका कुशंकांना पेच फुटले. पोलीस उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांच्या आदेशानुसार तीन दिवस मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवून या मृतदेहाचे कुणी नातेवाईक मिळत असल्यास त्याचा शोध घेतला. शेवटी मृतदेह अर्धवट अवस्थेत असल्यामुळे जास्त दिवस ठेवणे शक्य नव्हते. धामणगाव रेल्वे तालुक्यात कार्यरत असलेल्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांना धामणगाव रेल्वे पोलिसांनी माहिती दिली असता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.

आज दुपारी बारा वाजता ४५ डिग्री तापमाना मध्ये सुद्धा कशाचीही पर्वा न करता. मातोश्री फाउंडेशन ने स्वतः गाडी आणून मृतदेहावर हिंदू स्मशानभूमी धामणगाव रेल्वे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन-तीन दिवसापूर्वीच धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर या ठिकाणी सुद्धा मातोश्री फाउंडेशनने बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले होते त्यानंतर लगेच दोन-तीन दिवसानंतर कुजलेल्या अर्धवट पार्थिवशरीराचे मातोश्री फाउंडेशन ने स्वखर्चाने अंत्यसंस्कार धामणगाव रेल्वे येथील हिंदू स्मशानभूमीत पार पाडले.
यावेळी मंगरूळ दस्तगीर येथील मातोश्री फाउंडेशन चे कार्यकर्ते पोलीस कर्मचारी प्रवीण चौधरी, हवालदार दीपक पंधरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू, उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!